करमाळा (सोलापूर) : शिवजयंती उत्सव समिती करमाळा शहर व तालुकाच्या वतीने शिवजयंतीची जोरदार तयारी सुरु आहे. श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त करमाळ्यात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. मंगळवारी (ता. 18) मध्यरात्री 12 वाजता फटाक्यांची आताशबाजी करून श्री. छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष करून 19 फेब्रुवारीची सुरुवात केली जाणार आहे. सकाळी 7 वाजता दुग्धअभिषेक करून वंदन केले जाणार आहे.
करमाळा शहरातील प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेजमधील शिक्षक- विद्यार्थी यांच्या माध्यमातून लेझीम नृत्य, टीपऱ्या नृत्य, ग्रृप डांस व सामाजीक संदेश देणारे पथनाट्य सादर केले जाणार आहेत. नवीन वक्ते व विचारवंत, वाचकवर्ग तयार व्हावेत यासाठी भाषनेही घेतली जाणार आहेत.
करमाळ शहरातील व ग्रामीण भागातील लेझीम संघ विषेश सहभाग नोंदवणार आहेत. मल्लखांब, मर्दनी खेळ असे विविध कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय रक्तदान शिबिरही घेतले जाणार आहे, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
भव्य मिरवणूक…
19 फेब्रुवारीला सायंकाळी 4 वाजता किल्ला वेस महादेव मंदिर येथून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीचे स्वरूप जय गणेश डीजे साऊंड व लाईट पुणे, नागनाथ लेझीम संघ शेटफळ, चाऊस बँड वैजापूर, सुजित बँड वाशी, अमर बँड बारामती, रज्जाक भाई बँड करमाळा, झंकार बँड करमाळा, भाई भाई बँड करमाळा, दोस्ती बँड करमाळा, अनिकेत फोटोग्राफी, एस के लीड वाल व CO2 पेपर ब्लास्टर तसेच घोडे व उंट हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असणार आहे.