बीड व परभणीतील घटनेप्रकरणी मंगळवारी करमाळ्यात आंदोलन

करमाळा (सोलापूर) : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या व परभणीतील आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी मंगळवारी (ता. 31) करमाळ्यात प्रा. रामदास झोळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाणार आहे. याबाबत आज (शुक्रवारी) निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी प्रा. झोळ यांच्यासह शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ कांबळे, माजी नगरसेवक अतुल फंड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *