करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने गेल्यावर्षीचे थकीत ऊस बील शेतकऱ्यांना अद्याप दिले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दिवाळी झाली तरी उसाचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यातूनच आज (मंगळवारी) करमाळा तहसील कार्यालयसमोर सकाळी ११ वाजता बोबाबोब आंदोलन केले जाणार आहे.
यापूर्वी संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीतही हा विषय झाला होता. संगोबा येथे झालेल्या उपोषणावेळी कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर यांनी बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्या सांगण्यावरून २० तारीख मुदत दिली होती. ती मुदतही संपली आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.