करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील ढोकरी येथे सकाळी 9.30 वाजताची एसटी बस आजपासून सुरु झाली. त्या बसचे वांगी परिसरातील नागरिकांनी पूजन करुन स्वागत केले.
एसटी बसचे कंडक्टर, ड्रायवरचा फेटे बांधून यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. आदिनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, पैलवान शिवाजी खरात, शंकर दादा खरात, सरपंच देवा पाटील, भारत सलगर, शंकर सांगवे, पांडुरंग गडदे, काका पाटील, बाबासाहेब चौगुले, आदित्य बंडगर, विठ्ठल शेळके, दत्तु सरडे, महेंद्र पाटील, सौदा सरडे, भानुदास सरडे, आबा नलवडे, संजय नलवडे, विट्ठल सरडे, धनंजय शेटे, सुधीर देशमुख, गणेश पाटील, अवू पाटील, अमोल माने, गणेश देशमुख, अनिल आरकिले, संजय आरकिले, विठ्ठल आरकिले, रमेश जाधव, शहाजी कांबळे आदी उपस्थित होते.