करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीनिमित्त माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांची चिखलठाण येथे सभा होणार आहे.
महायुती आदिनाथ बचाव पॅनलची आज चिखलठाण येथे सभा आहे. सायंकाळी या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले सातपुते उपस्थित राहणार आहेत. अकलूजकरांवरती ते कोणती तोफ डागणार याची उत्सुकता करमाळा तालुक्यातील सभासदांना लागली आहे. आदिनाथच्या प्रचारामध्ये महायुती आदिनाथ बचाव पॅनलने आघाडी घेतली असून आता शेवटच्या टप्प्यात निर्णायक अवस्थेमध्ये स्टार प्रचारक म्हणून राम सातपुते आज चिखलठाण येथे येणार आहेत. या प्रचार सभेसाठी माजी आमदार शिंदे, बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती चंद्रकांत सरडे यांनी दिली आहे.