करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकार्य केलेले सर्व कार्यकर्ते व मतदारांचे मकाई परिवर्तन पॅनेलचे प्रमुख प्रा. रामदास झोळ यांनीआभार मानले आहेत. बारा बांगला येथे संपर्क कार्यालयात त्यांनी काही माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. तालुक्यात सर्व ठिकाणी शांततेत मतदान झाले असून आम्ही कारखाना अडचणीतून काढण्यासाठी सभासदांना पर्याय देण्याचा प्रयत्न केला. याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आमचे अर्ज अपात्र ठरल्याने संपूर्ण पॅनल देऊ शकलो नाहीत. मात्र तरीही जे अर्ज पात्र त्यांना मतदान करण्याचे आम्ही आवाहन केले होते. आमची न्यायालयीन लढाई ही सुरु आहे. या सर्व प्रक्रियेत सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार, असे ते म्हणाले आहेत. यापुढेही ही लढाई सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.


