सकल मराठा समाज माढा व रणजितसिंहभैय्या शिंदे मित्र मंडळच्या वतीने मराठा बांधवांसाठी अल्पोपहार

Refreshments for the Maratha brothers on behalf of Sakal Maratha Samaj Madha and Ranjitsinghbhaiyya Shinde Mitra Mandal

करमाळा (सोलापूर) : आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ, निमगांव टें तालुका माढा, सकल मराठा समाज, माढा तालुका व रणजितसिंह भैय्या शिंदे मित्र मंडळ, माढा तालुका यांच्या वतीने सोलापूर येथे होणाऱ्या शांतता रॅलीसाठी आलेल्या मराठा समाज बांधवांसाठी छत्रपती संभाजीमहाराज चौक, पुणे नाका, सोलापूर येथे अल्पोपहाराची व पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी सुमारे 200 मराठा स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.

बुधवारी (ता. ७) मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील हे शांतता रॅलीसाठी १२ वाजता सोलापूर येथे येणार आहेत. या रॅलीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव सोलापूर येथे गर्दी करणार आहेत. त्या ठिकाणी संबंध जिल्ह्यातून येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या सोयीसाठी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह भैय्या शिंदे मित्र मंडळाच्या वतीने एक लाख बांधवाना अल्पोपहार दिला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *