करमाळा (सोलापूर) : नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना माजी आमदार नारायण पाटील यांच्या अजेंड्यावर पहिल्या क्रमांकावर आहे, असे पाटील गटाचे सुनील तळेकर यांनी सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेऊर येथे पदाधिकारी बैठक झाली त्या बैठकीत ते बोलत होते. आतापर्यंत तीन बैठकांमध्ये 60 गावातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची मते जाणून घेतली. आज (गुरुवारी) चौथी बैठक झाली. पोथरे, निलज, कामोणे, खडकी, आळजापूर, जातेगाव, पुनवर, वडगाव दक्षिण, वडगाव उत्तर, मांगी, भोसे, रायगाव, वंजारवाडी, कुराणवाडी, लिंबेवाडी, बिटरगाव श्री, हिवरवाडी, घारगाव, तरटगाव, बाळेवाडी, पाडळी, बोरगाव, दिलमेश्वर, पोटेगाव, वाघाचीवाडी, वीट, अंजनडोह, उमरड, सोगाव पूर्व, मांजरगाव, रिटेवाडी, पोंधवडी, विहाळ, मोरवड, रोशेवाडी, पिंपळवाडी, झरे गावातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी मते मांडली.
या बैठकीत पाटील गटाचे प्रा. अर्जुनराव सरक यांनी मार्गदर्शन केले. तर माजी सदस्य अशोक पाटील, आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, सभापती अतुल पाटील, उपसभापती दत्ता सरडे, माजी सभापती शेखर गाडे, बिभीषण आवटे, सरपंच पृथ्वीराज पाटील, गणेश चौधरी, नेमीनाथ सरडे, रामभाऊ नलवडे, विलास बरडे, बाजार समिती माजी संचालक बाबासाहेब बोरकर यांनी सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भुमिका जाणुन घेतल्या. उमेदवारी आणि पाठींबा या अगोदर विकासकामे हाच पाटील गटाचा निवडणुकीतील मुळ मुद्दा असल्याचे तळेकर यांनी स्पष्टपणे सांगितले. प्रास्ताविक संजय फडतरे यांनी केले तर आभार योगेश खंडागळे यांनी मानले. सुत्रसंचलन बाबासाहेब कोपनर यांनी केले.