करमाळा (सोलापूर) : गॅस लिकेज व त्यातून होणारे अपघात टाळण्यासाठी करमाळा येथील लक्ष्मी वैभव गॅस एजन्सीच्या वतीने बिटरगाव श्री येथे ग्राहकांमध्ये जनजागृती व सुरक्षा शिबिर घेण्यात आले. गॅस एजन्सीचे मालक वैभव शेंडे यावेळी उपस्थित होते. त्यांनी गॅसचे महत्व व लिकेज संदर्भातील सुरक्षा कशी करावी याची माहिती दिली.
शेंडे म्हणाले, कंपनीकडून प्रत्येक ग्राहकांचा विमा संदर्भात माहिती सांगितली. गॅस दुर्घटना होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. काळजी कशी घ्यावी याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. गॅस एजन्सीचे मेकॅनिक सचिन मडके व गोपाल वाघमारे यांच्याकडून गॅस टाकी पेटल्यावर कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भात प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. या शिबिरासाठी बिटरगाव श्री येथील ग्रामसंघाच्या अध्यक्षा, बचत गटाच्या महिली यांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील अनेक महिला उपस्थित होत्या.