करमाळा (सोलापूर) : सकल महादेव कोळी समाज करमाळा शहर व तालुकाच्या वतीने करमाळा तहसिल कार्यालयावर हलगीनाद मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या मोर्चाची सुरुवात कानाड गल्ली येथील महर्षि वाल्मिकी मिञ मंडळ समाज मंदिर येथुन करण्यात आली. या निवेदनात म्हटले आहे की, २५ सप्टेंबरपासून महादेव कोळी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सोलापूर येथे समाज बांधव आमरण उपोषणास बसलेले आहेत. महादेव कोळी समाज हा अनुसुचित जमाती या प्रवर्गात समाविष्ट असताना देखील जातीच्या दाखल्याबाबत शासनाने अनेक जाचक अटी घातल्या आहेत. त्या सर्व रद्द करून सुलभ पद्धतीने जातीचे दाखले मिळावेत. तसेच विविध प्रश्नांबाबत हे बांधव प्राणांतिक उपोषण करीत आहेत. तसेच सोलापूर येथे चालू असलेल्या कोळी समाजाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यात आला. यावेळ सकल महादेव कोळी समाज करमाळा शहर व तालुक्यातील बंधू-भगिनी व कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
करमाळा तहसीलदारांना सकल महादेव कोळी समाजाचे निवेदन
