सोलापूर : महिला बचत गटाच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी व जाहिरात प्रचार प्रसार व्हावा या हेतूने 26 ते 28 जानेवारी दरम्यान माविम व नाबार्ड यांच्या वतीने जिल्हास्तरावर महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री आणि प्रदर्शन वोरोनोको हायस्कूल, रंगभवन जवळ, हिराबाई देवकर प्रशालेजवळ होणार असल्याची माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सोमनाथ लामगुंडे यांनी दिली.
विविध योजनेअंतर्गत स्थापन करण्यात आलेले 10 हजार 930 स्वयंसहायता महिला बचत गट व 1 लाख 15 हजार 641 सभासद आहेत. बचत गटांच्या चिरकालीन संस्था टिकण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात लोकसंचलित साधन केंद्र व शहरी भागात शहरस्तरीय संघ ही संकल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या आधारे सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यात एकूण 22 ग्रामीण व 10 शहरी केंद्र व्यवस्थापक व त्यांच्या अधिनस्त कार्यरत असलेला इतर कर्मचारी वर्ग, यांच्या माध्यमातून चालवत आहे.
नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योम विकास प्रकल्प हा शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाच्या माध्यमातून गरीब व गरजुवंत कुटुंबाचा सामाजिक, आर्थिक विकास साधने असा आहे. महिलांचे स्वयं सहाय्यता बचत गट स्थापन करून विविध वित्त पुरवठा संस्थाकडून वित्त पुरवठा केला जातो. त्यामधून महिलांनी शेती, बिगर शेती व्यवसायात भांडवल गुंतवणूक करून उद्योग व्यवसायाची उभारणी केली आहे. सदर उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी व जाहिरात प्रचार प्रसार व्हावा या हेतूने जिल्हास्तरावर महिला बचत गट उत्पादित वस्तु व खाद्यपदार्थ विक्री आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी, सोमनाथ लामगुंडे यांनी केले आहे.