करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात आज (शनिवारी) सकाळी पोस्टल मतमोजणी सुरु झाली. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील हे आघाडीवर आहेत. पोस्टल मतमोजणी झाल्यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणी सुरु होणार आहे.
पहिल्या फेरीत उमेदवाराला मिळालेली मते
संजयमामा शिंदे : १९६१
नारायण पाटील : ३०८४
दिग्विजय बागल : २३२२
रामदास झोळ : १३९
इतर आहे
नारायण पाटील ७६५ लीड
करमाळ्यात माजी आमदार नारायण पाटील हे तिसऱ्या फेरीतही आघाडीवर
करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील हे तिसऱ्या फेरीतही आघाडीवर आहेत.
संजयमामा शिंदे : ६१५७
नारायण पाटील : ९७१४
दिग्विजय बागल : ८८०१
यातील आकडेवारी सतत बदलत आहे. बातमी पहाण्यासाठी फक्त रिफ्रेश करा.