केम सोसायटीच्या अध्यक्षपदी सारिका शिंदे यांची बिनविरोध निवड

Sarika Shinde elected unopposed as President of Kem Society

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी माजी आमदार जयवंतराव जगताप गटाच्या सारिका शिंदे यांची व उपाध्यक्षपदी चंद्रकांत दोंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून प्रभारी सहाय्यक निबंधक उमेश बेंढारी यांनी काम पाहिले.

केम विकासे सोसायटीची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली होती. या निवडीप्रसंगी संचालक दिलीप दोंड, विलास बिचितकर, आनंद शिंदे, दयानंद तळेकर, दत्तात्रय बिचीतकर, महादेव पारखे, अच्युत तळेकर, किरण तळेकर, कौशल्या दोंड, नवनाथ कोळेकर, बाळासाहेब देवकर, सुमीत ओहोळ, मार्केट कमिटीचे संचालक सागर दोंड, संजय दोंड, भिमराव शिदे यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी नगराध्यक्ष वैभव जगताप आदींनी त्यांचा सत्कार केला. प्रास्तविक सोसायटीचे सचिव बबनराव मेहेर यांनी तर आभार गटसचिव लक्ष्मण थोरात यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *