करमाळा (सोलापूर) : पोथरे- निलज ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच धंनजय झिंजाडे यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसानिमित्त श्री देवीचामाळ येथील श्री जगदंबा कमलाभवानी मूकबधिर निवासी विद्यालय येथे विद्यार्थ्यांना जेवण दिले आहे. यावेळी त्यांचा विद्यार्थ्यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या आहेत. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय काळे व अधीक्षक श्री. पाटणे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. क्रीडा शिक्षक श्री. कुंभार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ग्रामरोजगार सेवक दत्ता हिरडे हे यावेळी उपस्थित होते.

