करमाळा (सोलापूर) : येथील ओम मदन निंबाळकर यांचा संस्कृत विषयातून पदवीपूर्व शिक्षणासाठी देशातील नंबर दोनच्या दिल्ली येथील दिल्ली विश्वविद्यालय हंसराज कॉलेजमध्ये निवड झाली आहे. ही निवड संपूर्ण देशातून पूर्व परीक्षा घेऊन केली जाते. सदर परीक्षेत देशातील अडीच लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये ओम निंबाळकरला 93.80 टक्के मार्क मिळाले आहेत. ओम निंबाळकर हा निंबाळकर सेतूचे संचालक मदन निंबाळकर याचा मुलगा आहे. त्याचे यापूर्वीचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय पोखरापुर (मोहोळ) येथे झाले आहे.
भारताचे चैतन्य त्याचे स्वरूप संस्कृत या भाषेत आहे. संस्कृत ही केवळ एक भाषा नाही. भारतात तिचा अभ्यास केवळ विशिष्ट भाषेचे ज्ञान मिळवण्यासाठी होत नाही. तर भारत देशात सर्वात पवित्र स्वरूपात ज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी होत आहे. संस्कृतच्या अभ्यासातून आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. ओमला सोलापूर जिल्हा पुनर्वसन अधिकारी सोपान टोंपे व निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रपूर पवार यांनी मार्गदर्शन केले. पुढील शिक्षणासाठी करमाळा येथील प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव व नायब तहसिलदार बाबासाहेब गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.