Selection of Siddharth Manjule from Yashwantrao Chavan College for school division level outdoor competition

करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयमधील 11वी सायन्सचा विद्यार्थी सिद्धार्थ मंजुळे याची शालेय विभागस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शुक्रवारी (ता. ४) क्रीडा व युवक सेवा संचालनालयअंतर्गत सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी व सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद मार्फत शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा एस. आर. पी. एफ, दहा नंबर, सोरेगाव, जिल्हा सोलापूर येथे झाली.

या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यामधील ११ तालुक्यातून विजयी झालेले विविध खेळातील विविध खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामधील खेळाडू सिद्धार्थ मंजुळे हा १०० मीटर धावणे या खेलबाबी मध्ये करमाळा तालुक्यामधून प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. आज झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धच्या १०० मीटर धावणे मध्ये सुद्धा त्याने जिल्हास्तरावर विजय प्राप्त करून त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. या यशस्वी खेळाडूला महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.रामकुमार काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक,वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *