यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Selection of Yashwantrao Chavan College students for district level sports competition

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने तालुकास्तरीय पावसाळी मैदानी स्पर्धा झाल्या. या स्पर्धेचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते झाले.

संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, तालुका क्रीडा समन्वयक प्रा. राम काळे व तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या विद्यालयातून आलेल्या व महाविद्यालयातून आलेल्या स्पर्धकांचे स्वागत करण्यात आले होते. तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनी घवघवी यश संपादन केले.

शुभम हुलगे (लांब उडी- प्रथम क्रमांक), ओंकार वाघमारे (थाळीफेक- प्रथम क्रमांक), अमृता शिंदे (लांब उडी- प्रथम क्रमांक), प्रणव विटकर (तिहेरी उडी व बांबू उडी मुले- प्रथम क्रमांक), सिद्धार्थ मंजुळे (100 व २०० मीटर धावणे- प्रथम क्रमांक), अजिंक्य दळवी (800 व ३००० मीटर धावणे- प्रथम क्रमांक), रोशन गोरे (1500 मीटर धावणे- प्रथम क्रमांक), प्रतीक्षा एकाड (1500 मीटर धावणे- प्रथम क्रमांक), अश्विनी शिंदे (3000 मीटर धावणे- प्रथम क्रमांक), राजेश गोरे, मच्छिंद्र लोंढे, अशफ अत्तार आदी विद्यार्थीची तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *