करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जातेगाव येथे गुरुवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता ‘ऊस शेतीतील आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान’ यावर चर्चासत्र होणार आहे. भैरवनाथ मंदिर येथे हे चर्चासत्र होणार असून परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये बारामती ऍग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष सुभाष गुळवे, बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे कृषी तज्ञ संतोष करंजे व बारामती ऍग्रोचे ऊस विभाग प्रमुख प्रवीण भापकर हे मार्गदर्शन करणार आहेत.
जातेगावमध्ये उद्या ‘ऊस शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान’ AIवर चर्चासत्र
