करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीच्या वीट गणातून ग्रामपंचायतचे माजी सदस्य नवनाथ जाधव, माजी उपसरपंच विठ्ठल माळी, माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद जाधव यांनी मुलाखत देत ही निवडणुक पुर्ण ताकदीने लढवून जिकंण्याची ग्वाही दिली. करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या निवास्थानी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकीबाबाबत व पदवीधर मतदार नोंदणीबाबत चर्चा झाली. यावेळी वीट पंचायत समिती गणासाठी उपसरपंच हेमंत आवटे, किरण ढेरे, बिभीषण ढेरे, संदीप ढेरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
वीट गट ताकदीने लढवून विजयी करू, शिंदे समर्थकांचा निर्धार
