करमाळा (सोलापूर) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार करमाळा तालुक्यात सीना नदीच्या पुरामुळे बाधीत झालेल्या 5 हजार नागरिकांना आज (शनिवारी) मदत देण्यात आली आहे. अहिल्यानगरचे नगरसेवक मदनराव पाटील यांनी हे खास साहित्य किट नगरहून आणले होते. शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या उपस्थितीत या किटचे बिटरगाव (श्री) येथे वाटप करण्यात आले. याबरोबर महामुनी मंगल कार्यालय येथे स्थलांतरित केलेल्या कुटुंबानाही खिचडी वाटप करण्यात आली आहे.
करमाळा तालुक्यात सीना नदीमुळे खडकी, आळजापूर, बिटरगाव श्री, तरटगाव, बाळेवाडी, पोटेगाव, निलज, बोरगाव या गावांना मोठा फटका बसला होता. अनेक घरात पाणी शिरले व शेतीचे मोठे नुकसान या पुरामुळे झाले. त्यांना मदतीची गरज असून याची सुरुवात चिवटे यांच्या माध्यमातून झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. आज दोन हजार किट करमाळ्याला पाठविले आहेत, असे मदन आढाव यांनी सांगितले. यावेळी प्रमोद कोरडे, मिलिंद जागते, संदीप ससे, गणेश सिनारे, आदी उपस्थित होते.
पुरामुळे विस्थापित झालेल्या सुमारे 300 नागरिकांना माहामुनी कार्यालयात ठेवण्यात आले होते. त्यांना चिवटे यांच्या उपस्थितीत खिचडी वाटप करण्यात आली. याबरोबर पूरग्रस्तांना साखर, चहा पावडर, साडी, कपडे, ड्रेस, टूथपेस्ट, साबण, पोहे आधी साहित्य देण्यात आले. बिटरगाव श्री येथील वाटपावेळी पत्रकार अशोक मुरूमकर, पोलिस पाटील भूषण अभिमन्यू, सामाजिक कार्यकर्ते बबनदादा मुरूमकर, सागर शिंदे, अमोल घोडके, गजेंद्र बोराडे, भगवान मुरूमकर, बाळासाहेब माने, संतोष माने, ग्रामरोजगार सेवक प्रवीण घोडके, आदिनाथ बाबर, युवराज देवकर, बापूराव मुरूमकर आदी उपस्थित होते.