Shivsena will contest five seats in Solapur district along with Karmala

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथे शिवसेना (शिंदे गट) धनुष्यबाणावरच लढवणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही, असे युवा सेनेचे सचिव किरण साळी यांनी स्पष्ट केले आहे.
गावात राहून १० हजार कमवण्याची संधी! ‘मुख्यमंत्री योजनादूत’साठी जिल्ह्यात ८६५ अर्ज; प्रत्येक गावात नेमला जाणार एक योजनादूत

करमाळा येथे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निमित्ताने महिलांचा स्नेह मेळावा झाला. करमाळ्यासह जिल्ह्यातील पाच जागा धनुष्यबाणावर लढवणार असे त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, डॉ. श्रद्धा जवंजाळ, तालुका संपर्कप्रमुख रवी आमले, जिल्हा प्रमुख महेश चिवटे आदी उपस्थित होते. यातील बांधकाम नोंदणीकृत 567 महिलांना प्रत्येकी दहा हजार ८० रुपयांची भांडी देण्यात आली.
उडीदाचे भाव पडल्याने करमाळ्यात शेतकऱ्यांनी पाडला लिलाव बंद! सहाय्यक निबंधकांनी मागितले कारण, सभापती व सचिवांचे म्हणणे पहा…

साळी म्हणाले, 1995 पासून करमाळा मतदारसंघात शिवसेना धनुष्यबाणावर निवडणूक लढवत आहे. अनेकजन आले आणि गेले पण पक्ष जागेवर आहे. शिवसेनेला मानणारा येथे मोठा मतदार आहे. जिल्हाप्रमुख चिवटे यांच्या नेतृत्वाखाली सक्षम पक्ष बांधणी झाली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सर्व महिला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान करणार आहेत. त्यामुळे करमाळा मतदार संघातील शिवसेनेचा विजय निश्चित आहे, असेही ते म्हणाले.
आईच्या नावासाठी फॉरमॅट ठरला! जन्म प्रमाणपत्रावर नोंद करण्याबाबत बीडीओंचा ग्रामसेवकांना आदेश

सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी सात जागा शिवसेना लढवत होती. चार ते पाच आमदार शिवसेनेचे निवडून यायचे. तालुकाप्रमुख राहुल कानगुडे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, शहरप्रमुख संजय शीलवंत, युवा सेना तालुका प्रमुख नवनाथ गुंड, ओबीसी आघाडीचे जिल्हा प्रमुख सुरेश करचे, शहर प्रमुख माधव सूर्यवंशी, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख ज्योती शिंदे यावेळी उपस्थित होते. डॉ. गौतम रोडे यांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना उपतालुकाप्रमुख म्हणून नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *