करमाळा (सोलापूर) : कराड येथील श्री मळाई ग्रुपच्या वतीने अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठच्या पूरग्रस्तांना मदत देण्यात आली. डॉ. स्वाती थोरात व डॉ. अश्विनी घाडगे- ठोंबरे यांच्या विनंतीनुसार तरटगाव, बाळेवाडी व पोटेगावमधील १३७ पूरग्रस्तांना गहू, तांदूळ, साखर, डाळी, तिखट, खाद्यतेल, चहा पावडर, शेवया, गुळ, साडी, लहान मुलांची कपडे व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले.
श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेतून विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितिचे सामाजिक भान यावे या उद्देशाने ऐच्छिक मदतीचे आवाहन केले होते. त्यातून आलेल्या मदतीमध्ये श्री मळाई देवी नागरी पतसंस्थेतून भरीव मदत घालून पूरग्रस्तांना मदत करण्यात आली. माढा तालुक्यातील दारफळ सीना गावामध्येही ५०० पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य व कपडे पुरविण्यात आली. पतसंस्थेचे अध्यक्ष अजित थोरात, श्री मळाई ग्रुपचे गरुड यांचे मार्गदर्शनानुसार करमाळा येथील शिवरत्न ग्रामीण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमरजित साळुंके, भीमराव माहूर, तुळशीराम शिर्के, अमोल जाधव, अनिल शिर्के, शेखर शिर्के, मुख्याध्यापिका ज्योती शिंदे व सहकारी, श्री. मळाईदेवी शिक्षण संस्थेतील सर्व शाखांचे मुख्याध्यापक, पतसंस्थेचे सर्व शाखांचे शाखाप्रमुख यांनी योग्य नियोजन करून मदतीचे पूरग्रस्तांना वाटप केले.