जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीचे करमाळ्यात मंत्री भरणे यांना सोलापूर जिल्हा पेन्शन संघटनेचे निवेदन

करमाळा (सोलापूर) : राज्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांना आज (रविवारी) करमाळा (मोरवड) येथे निवेदन देण्यात आले. सोलापूर जिल्हा पेन्शन संघटनेचे तात्यासाहेब जाधव, मधुकर शिंदे व विक्रम राऊत यावेळी उपस्थित होते.

राजस्थान, छत्तीसगढ, झारखंड व हिमाचलमध्ये जुनी पेन्शन योजना सुरू झाली आहे. कर्नाटकमध्येही लवकरच ही योजना सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी आहे. त्यासाठी आंदोलनेही होत आहेत. राज्यातील पाच लाख कर्मचाऱ्यांना यांचा लाभ मिळणार आहे.

धाराशिव जिल्ह्यातील २००५- ६ मधील शिक्षण सेवक सरळसेवा भरती प्रक्रियेतील दोन्ही जाहिराती स्वतंत्र नसून त्या एकमेकांशी संलग्न (Attached) असल्याने त्या दोन्ही जाहिरातीमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. सातव्या वेतन आयोगातील प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीतील (चटोपाध्याय) त्रुटी निराकरण करण्यात यावे याबाबत निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *