सोनाली कुलकर्णीच्या उपस्थितीत उद्या केममध्ये ‘सोलापूर उद्योगरत्न’चे वितरण

करमाळा (सोलापूर) : केम येथील युगंधर ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवारी (ता. २) इंद्रायणी लॉन्सवर सायंकाळी ६ वाजता ‘सोलापूर उद्योगरत्न २०२४- २५’ पुरस्काराचे वितरण होणार आहे. करमाळा तालुक्यातील व्यवसाय क्षेत्रातील उत्तुंग यश मिळविणाऱ्या उद्योजकांचा यावेळी सन्मान होणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह ओहोळ यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *