दक्षिण सोलापूरला तहसीलदार मिळाले, करमाळ्याला मात्र प्रतीक्षाच

South Solapur got Tehsildar Karmala has to wait

सोलापूर : पुणे विभागातील सोलापूर येथील काही तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले किरण जमदाडे यांना दक्षिण सोलापूरचा तहसीलदार पदाचा पदभार मिळाला आहे. तर करमाळ्याचा यामध्ये उल्लेख नसल्याने येथे अजूनही तहसीलदारांची प्रतीक्षाच राहिलेली आहे.

पुणे विभागातील तहसीलदार संवर्गातील पदस्थापनेबाबत आज (गुरुवारी) आदेश काढले आहेत. यामध्ये दक्षिण सोलापूरच्या तहसीलदर उज्वला सोरटे यांची बदली पुणे येथे निवडणूक विभागात झाली आहे. तर त्यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर जमदाडे यांची नियुक्ती झाली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण विभागातील तहसीलदार अंजली कुलकर्णी यांची बदली पुणे येथे संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदारपदी झाली आहे. बालाजी शेवाळे यांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या ठिकाणी त्यांची बदली झाली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्परचिटणीस (कुळ कायदा) विभागातील सुनिता नेर्लीकर यांची बदली कोल्हापूरमध्ये जिल्हा पुरवठा सहाय्यकपदी झाली आहे. हे पद येथे रिक्त होते.

करमाळ्याचे तहसीलदार समीर माने यांची बदली झाल्यापासून येथील पदभार प्रभारी म्हणून नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्याकडे आहे. तीन महिन्यापासून त्यांच्याकडे हा पदभार असून त्यांनी तालुक्यात चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. अशा स्थितीत करमाळ्याला कोण तहसीलदार येथील अशी चर्चा होती. मात्र आजच्या आदेशात करमाळ्याचा उल्लेख नसल्याने जाधव यांच्याकडे पदभार राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *