करमाळा (सोलापूर) : करमाळा एसटी आगारात नवीन एसटी येऊन देखील ब्रेकडाऊनचे सत्र सुरूच आहे. आज (शुक्रवारी) पारेवाडीला जाणारी मुक्कामी गाडी कोर्टीजवळ (शेरे वस्ती) बंद पडली आहे. गाडी बंद पडल्यानंतर तास झाला तरी प्रवाशांना दुसऱ्या गाडीची व्यवस्था झालेली नाही, अशी तक्रार आली आहे. आज शुक्रवार असल्याने गाडीला गर्दी होती. त्यात महिला प्रवासीही आहेत. पारेवाडीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली असून आगारप्रमुखांनी यामध्ये त्वरित लक्ष घालून नवीन गाडीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.
नवीन गाड्या येऊनही एसटी बसचे ब्रेकडाऊन सत्र सुरूच! करमाळा- पारेवाडी मुक्काम गाडी दोन तासांपासून बंद
