करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा आगारातून आयोध्याला श्रीराम दर्शनासाठी गेलेली एसटी बस यशस्वीरीत्या परतली आहे. ही बस घेऊन गेलेल्या चालकांचा करमाळा आगारात सत्कार करण्यात आला आहे. करमाळा आगारातून पहिली एसटी बस श्रीराम दर्शनासाठी अयोध्याला गेली होती. सोलापूर विभागातून ही पहिली एसटी बस असल्याचा दावा केला जात आहे.
परांडा तालुक्यातील शेळगाव येथील बाबासाहेब वारे महाराज यांच्या नेतृत्वाखाली ४४ भक्त करमाळा आगारातील एसटी बस घेऊन श्रीराम दर्शनासाठी गेले होते. शेळगावला करमाळा आगर जवळ असल्याने त्यांनी ही एसटी बस बुक केली होती. सात दिवसाचा प्रवास करून यशस्वीरीत्या ही बस परतली आहे. त्यामुळे चालक नंदकुमार काळे व शहाजी वीर यांचा आगार प्रमुख श्री. होनराव यांनी सत्कार केला आहे.
श्रीराम लल्लाच्या दर्शनासाठी देशभरातून भक्त अयोध्याला जातात. त्यातूनच करमाळा येथूनही एसटी बसने श्रीराम भक्त अयोध्याला गेले होते. सात दिवसांचा त्यांचा दौरा यशस्वी झाला आहे. नगर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, जामनेर, रावेर, कुहानपूर, उजैन, भोपाळ, कटनी, रिवा, प्रयागराज, वाराणसी, अयोध्या असा त्यांचा प्रवास होता.