करमाळा : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांचे हस्ते अत्याधुनिक व्यायाम शाळेचे उद्घाटन झाले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हे उदघाटन करण्यात आले आहे. याबरोबर मॅटवरील कबड्डी क्रीडांगणाचे उद्घाटनही झाले. विद्या विकास मंडळचे अध्यक्ष मिलिंद फंड, उपाध्यक्ष तात्यासाहेब मस्कर यावेळी उपस्थित होते. यावेळी विजयश्री सभागृहात गुणवंत क्रीडापटूंचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील होते.
प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले, ‘ध्यानचंद हे हॉकी खेळ स्वतः साठी खेळले नसून ते देशासाठी खेळले. ज्यांना जर्मनीचे हुकूमशहा हिटलर यांनी जर्मनीचे नागरिकत्व देण्याचे व जर्मनीसाठी खेळण्याचे आवाहन केले होते. परंतू ध्यानचंद यांनी हिटलर यांचा प्रस्ताव नाकारून आपल्या देशावरील प्रेमाचे दर्शन घडविले. यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांनीही मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळासही महत्त्व द्यावे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. अतुल लकडे यांनी केले तर आभार प्रा. अभिमन्यू माने यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास विद्या विकास मंडळाचे विश्वस्त चंद्रशेखर शिलवंत, सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, प्रकाश झिंजाडे उपस्थित होते.