बिटरगाव श्री येथील दारूविक्री बंद करा; भीमदलची मागणी

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथील बेकायदा दारुविक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी भीमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले यांनी केली आहे.

करमाळा- जामखेड रस्त्यावरील बिटरगाव श्री येथे भाजपचे गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमीत्त किर्तन महोत्सव होणार आहे. या महोत्सवात अनेक मोठे महाराज येणार आहेत. मात्र येथे मोठ्याप्रमाणात बेकायदा दारू विक्री होत आहे. प्रसिद्ध समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांचे यामध्ये किर्तन होणार आहे. या किर्तन महोत्सवाचे चालक हे पत्रकार आहेत. त्यामुळे येथील दारुविक्री बंद होणे गरजेचे आहे.

बिटरगाव श्री येथे काही दिवसांपूर्वी बेकायदा दारुविक्री बंद झाली होती. मात्र नंतर जोरात दारुविक्री सुरु आहे. याकडे गावकर्यांनी गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *