करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथील बहुचर्चित रस्त्यावर युवा नेते प्रवीण मुरूमकर यांच्या पुढाकारातून मुरुमीकरण करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम झालेले नव्हते. गावातील सर्व रस्त्यांची कामे झाली होती मात्र या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. बिटरगाव श्री ग्रामपंचात विरोधी गटाकडे असूनही आमदार संजयमामा शिंदे यांनी या रस्त्यासाठी निधी दिला होता. परंतु तो निधी कमी पडत असल्याने युवा नेते मुरूमकर यांनी पुढाकार घेऊन मुरुमीकरण करून दिले आहे.
प्रवीण मुरूमकर यांच्या आई ग्रामपंचायत सदस्या आहेत. त्यांचे वडील प्रकाश मुरूमकर हे माजी उपसरपंच आहेत. त्यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानंतर त्यांनी या रस्त्याला ७ लाख निधीही मिळवला होता. मात्र विरोध झाल्याने हे काम करता आले नव्हते. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते बबनदादा मुरूमकर, चंद्रकांत चुंबळकर, गजेंद्र बोराडे, माजी सरपंच संतोष वाघमोडे, शिवाजी मुरुमकर यांनी पुढाकार घेऊन आमदार शिंदे यांच्याकडून ३ लाख रुपये मुरमीकरणासाठी निधी मिळवला होता. मात्र ग्रामपंचायत विरोधात असल्याने हे काम संबंधित ठिकाणी झालेच नाही. याचा त्रास या भागातील नागरिकांना बसत होता.
गावात तीन वर्षात एका रस्त्यावर चारवेळा काम झाले मात्र बिटरगाव श्री ते भोसले वस्ती हा रस्ता झाला नाही. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य चत्रभुज मुरूमकर, पत्रकार अशोक मुरूमकर, वैभव मुरूमकर, प्रवीण घोडके, दादा मुरूमकर, दिलीप मुरूमकर यांनी पाठपुरावा करून पुन्हा आमदार शिंदे यांच्याकडून या रस्त्यासाठी १० लाख निधी मिळवला. रस्त्यासाठी असलेला वादही पुढे होऊन मिटवला. रमेश माने व युवराज देवकर यांच्या सहमतीने या रस्त्याचे कामही सुरु झाले.
या रस्त्याचे काम, उपलब्ध निधी आणि सबंधित क्षेत्र यामुळे येथे आणखी निधीची आवश्यकता होती. त्यावर आणखी निधी देण्याचे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले होते. हे काम आणखी मजबूत व्हावे यासाठी प्रस्तावही दिलेला आहे. यावर आणखी निधी मिळणार आहे. मात्र काम सुरु असताना काही शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. मात्र अंदाजपत्रकापेक्षाही जास्त साहित्य वापरल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. आमदार शिंदे यांनी दिलेल्या बळामुळे येथे खंडीकरण झाले होते. मात्र शेतकऱ्यांचे हीत पाहत प्रवीण मुरूमकर यांनी या रस्त्यासाठी पुढाकार घेऊन स्वखर्चाने आणखी मुरूम टाकून देण्याचा निर्णय घेतला.
प्रवीण मुरूमकर हे सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात. नवरात्रोत्सवासह गावात प्रत्येकाच्या मदतीला ते धावून येतात. त्यांच्या वडिलांचा चार वर्षांपूर्वी कुंभेज फाटा येथे अपघात झाला होता. तेव्हापासून त्यांना स्वतःला चालता येत नाही. त्यांचे गावात दूध संकलन केंद्र होते. मात्र अपघात झाल्यानंतर ते केंद्र बंद करण्यात आले. प्रकाश मुरूमकर हे देखील सामाजिक कामात अग्रेसर होते. त्यांच्या प्रेरणेनेच प्रवीण मुरूमकर व त्यांचे बंधू प्रफुल मुरूमकर हे सामाजिक काम करत आहेत.
स्तुत्य काम श्री.प्रवीण मुरूमकर ..