गुळवेंनी पालकमंत्री गोरे यांची विकास कामांसाठी घेतली भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हा परिषदेच्या करमाळा तालुक्यातील कोर्टी गटातील विविध विकास कामांबाबत सदस्या वनिता गुळवे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली आहे. यावेळी बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे उपस्थित होते.

बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे म्हणाले, ‘कोर्टी जिल्हा परिषदेच्या गटातील नागरिकांनी निवडणुकीत आमच्यावर विश्वास टाकलेला असून येणाऱ्या काळात त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या गटातील गावात विकास कामे व्हावीत यासाठी प्रयत्नशील आहे. पालकमंत्री गोरे यांची भेट घेऊन विकास निधी मिळावा याबाबत चर्चा केली आहे.’ गुळवे यांनी जिल्हाध्यक्ष दीपक वैद्य, भाजपच्या गटनेत्या रश्मी बागल यांचीही भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आहेत.

माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुळवे यांनी विजय मिळवला आहे. करमाळ्यात अजित पवार यांची राष्ट्रवादी व भाजप एकत्रितपणे निवडणुकीत उतरले होते. गुळवे यांनी निवडणूक होताच विकास कामांसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. पोन्धवडी येथील चारीत त्यांच्या प्रयत्नाने कुकडीचे पाणी आले आहे. आता विविध विकास कामांसाठी त्यांनी पालकमंत्री गोरे यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *