Subsidy deposit of second phase of milk subsidy scheme BJP Ganesh Chivte

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारने जाहीर केलेल्या दूध अनुदान योजनेनुसार दुसऱ्या टप्प्याचे दूध अनुदान आजपासून (बुधवार) दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिली आहे.

दूध खरेदी दरात घसरण झाल्याने राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. यापैकी पहिल्या टप्प्यात 11 जानेवारी ते 10 मार्च असे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर यापूर्वी जमा झाले आहे. दुसऱ्या टप्प्याचे अनुदान जमा होणे बाकी होते. दुसऱ्या टप्प्यातील जुलै ते सप्टेंबर 2024 असे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. यापैकी जुलै तील दुधाचे अनुदान आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार या दूध अनुदान योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये ऐवजी सात रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ही नवीन अनुदान योजना १ आक्टोबरपासून लागू होणार आहे. दुधाचे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार हे अनुदान जमा झाल्याची माहिती चिवटे यांनी दिली आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *