करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळप सुरू झाले आहे. गाळप ऊसाला टनाला २ हजार ७०० रुपये दर दिला जाणार आहे. उरलेल्या नफ्यातून पुन्हा शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहेत, असे प्रशासक बाळासाहेब बेंद्रे यांनी सांगितले आहे.
आदिनाथ कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत कमी खर्चात म्हणजे सव्वा कोटीत कारखाना दुरुस्त करून सुरू केला आहे. दोन जलवाहिनीचे कामही सुरू आहे. 2018-19 मधील ऊस उत्पादकांचे राहिलेले दोन कोटी ५३ लाख रुपये अदा केले आहेत. कारखाना विस्तारीकरणाचा सव्वाशे कोटीचा कर्ज प्रकरणाचा प्रस्ताव दाखल केला आहे. पारदर्शकपणे कारभार करत कारखाना पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. ऊस उत्पादक सभासदांनी कारखान्याला ऊस द्यावा, असे आवाहन प्रशासकीय मंडळ सदस्य महेश चिवटे व संजय गुटाळ यांनी केले आहे.