करमाळा (सोलापूर) : आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे म्हणून बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर यांनी संगोबा येथील श्री आदिनाथ महाराज यांच्याकडे साकडे घातले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळामध्ये पडळकर यांना कॅबिनेट संधी द्यावी, असे ते म्हणाले आहेत. अनिल पाटील, आप्पासाहेब चोरमले, सुरेश खराडे, बळीराम राऊत, नात्याबा कोळेकर, बबन भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.
पडळकर यांना मंत्री करावे यासाठी सुपनवरांचे आदिनाथ महाराजांकडे साकडे
