करमाळा (सोलापूर) : अंधश्रद्धा निर्मूलन समितीची करमाळा येथे संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालयात आज (शनिवार) बैठक झाली. रविवारी (ता. २०) सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जिल्हा बैठक होणार आहे. त्या बैठकीचे नियोजन करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
याशिवाय तालुक्यात नवीन सभासद वाढवणे, जनजागृतीबाबत कार्यक्रम घेणे आदी विषयांवर चर्चा झाली. यावेळी चमत्काराचे सादरीकरण जिल्हा प्रधान सचिव अनिल माने यांनी केले. मार्गदर्शक प्राचार्य नागेश माने यांनी सदस्य नोंदणीबाबत आवाहन केले. लक्ष्मण लष्कर यांनी चळवळीचे गीत सादर केले.
तालुका कार्याध्यक्ष दिगंबर साळुंखे, तालुका सचिव बाळासाहेब दुधे, बुवाबाजी संघर्ष सचिव राजेंद्र साने, सुनिल गायकवाड, रामचंद्र बोधे, मोरेश्वर पवार, संजय हंडे, सागर माने, नारायण पवार व संगिता निंबाळकर आदी यावेळी उपस्थित होते.