राष्ट्रवादीच्या मेळाव्यासाठी आमदार शिंदे समर्थक सोलापूरकडे रवाना; तालुकाध्यक्ष निवडीकडे लक्ष!

करमाळा (सोलापूर) : सोलापुरात आज (मंगळवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादीचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात आमदार संजयमामा शिंदे गटाचे शक्तीप्रदर्शन होणार आहे. या मेळाव्यात तालुकाध्यक्ष निवडीची घोषणा होणार असून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमदार शिंदे हे उपमुख्यमंत्री पवार यांना नेते मानतात. तालुक्यात पवार यांच्या माध्यमातून विकास कामे सुरु आहेत. तालुक्यात राष्ट्रवादी वाढवण्यावर भर दिला जात असून आमदार शिंदे यांच्या शिफारशीला विशेष महत्त्व असून तालुकाध्यक्ष म्हणून कोणाचे नाव पुढे येणार हे पहावे लागणार आहे.

सोलापुरात माजी आमदार दीपकआबा साळुंखे यांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार आहे. त्यासाठी करमाळ्यातून आमदार शिंदे गटाचे शेकडो समर्थक रवाना झाले आहेत. यामध्ये भारत आवताडे, सुजित बागल, अॅड. राहुल सावंत, आशपाक जमादार, भोजराज सुरवसे, शीतल क्षिरसागर, दत्तात्रय अडसुळ, दिनेश घोलप, तुशार शिंदे, सुरज ढेरे, राजेंद्र पवार, स्नेहल अवचर, नंदीनी लुंगारे, मंगल तेली आदीजण सोलापूरकडे रवाना झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *