करमाळा : चिखलठाण येथील श्रीमती रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. करमाळा येथे शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये संपूर्ण करमाळा तालुक्यातून विविध शाळांमधील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये १९ वर्षे वयोगटातील तालुकास्तरीय ८०० मीटर धावणे स्पर्धेत प्रतिभा संजय उंबरे द्वितीय, १५०० मीटर धावणे स्पर्धेत शिवानी संजय उंबरे प्रथम, ५ किमी चालणे स्पर्धेत सोहम सुरेश गुटाळ प्रथम, ५ किमी चालणे स्पर्धेत प्रतिभा संजय उंबरे प्रथम, गोळा फेक स्पर्धेत प्रदीप गणेश कांबळे प्रथम, कोमल क्षीरसागर प्रथम, २०० मी धावणे कोमल राजकुमार क्षीरसागर तृतीय या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक नागेश सरडे, विभाग प्रमुख वाय. एम. धस यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक दिलीप वायदंडे, सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
