करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या चेन्नई मुंबई मार्गावरील केम रेल्वे स्थानकाजवळील नाल्याखालील कॉक्रीटिकरणचा प्रलंबित प्रश्न प्रहार व श्री. उत्तरेश्वर युवा परिवर्तनच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे. अनेक वर्षांपासून पावसाळ्यात या रेल्वे नाल्याखाली पाणी साचत होते. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. नाल्याखालून जाताना वाहने अडकत होती. रेल्वे अधिकारी यांच्याकडून कायमस्वरूपी मार्गी लागावा म्हणून संदीप तळेकर यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु होता. त्याला यश आले असून काम सुरु झाले आहे.
प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर दौंड, श्री उत्तरेश्वर परिवर्तन ग्रुपचे अच्युत पाटील, शिवसेना जिल्हा समन्वयक सागर तळेकर, महावीर आबा, महेश तळेकर, भाजप जिल्हा सदस्य धनंजय ताकमोगे, सामाजिक कार्यकर्ते सचिन रणशिंगारे, डॉ. योगेश कुरडे, सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब देवकर, आनंद शिंदे, माजी सरपंच सुभाष कळसाईत, महादेव पाटमास, ग्रामपंचायत सदस्य सागर कुरडे, पिंटू ओहोळ, गोरख पारखे, दादासाहेब गोडसे, योगेश ओहोळ, अरुण लोंढे, सतीश खानट, बापू तळेकर, दादासाहेब पारखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.