करमाळा (सोलापूर) : तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना जिंती मंडळातील तीन ठिकाणचे कठीण रस्ते सामंजस्यातून खुले करण्यात यश आले आहे. हा रस्ता खुला झाल्यानंतर तेथील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून तहसीलदार ठोकडे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. कावळवाडी येथे महसूल पंधरवडा झाला यावेळी हे रस्ते खुले करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी संतोष गोसावी व इतर शेतकरी व अधिकारी उपस्थित होते. कोंढारचिंचोली येथील विठ्ठल गलांडे व इतर विरूद्ध बबन आंबादास गलांडे व इतर यांचा विवादग्रस्त रस्ता सामंजस्याने वाद मिटवून खुला करण्यात आला. त्यानंतर याचे लोकार्पण तहसीलदार ठोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या रस्त्यामुळे 23 शेतकरी खातेदार यांची 16 हेक्टर जमीनींचा रस्त्याचा प्रश्न मिटणार आहे.
तहसीलदार ठोकडे यांना जिंती मंडळातील वादग्रस्त तीन रस्ते खुले करण्यात यश
