बागल गटाने मानले मतदारांचे आभार

Thanks to Bagal Group voters

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्यासाठी आज (शुक्रवारी) मतदान झाले. हे मतदान झाल्यानंतर बागल गटाच्या प्रमुखांनी मतदारांचे आभार मानले आहेत. याबाबत सोशल मीडियावर बॅनर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपण सर्व शेतकरी सभासद बंधुभगिनींनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही प्रक्रियेस बळकटी दिली. त्याचबरोबर आपल्या ‘लोकनेते दिगंबररावजी बागल मकाई पॅनल’च्या प्रचारासाठी अहोरात्र झटलेल्या ज्ञात व अज्ञात सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक सर्वांचे आभार.’ याआपले विनीत बागल गट, करमाळा असे यावर म्हटले आहे. या बॅनरवर लोकनेते दिगंबररावजी बागल, माजी आमदार शामलताई बागल, साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल व बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांचा फोटो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *