Thanks to MLA Sanjay Shinde support for common patients

करमाळा (सोलापूर) : करमाळा उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ञ हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या रुग्णालयात कायमच्या भूलतज्ञाची नियुक्ती होत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाने कायमचे भूलतज्ञ मिळाले आहेत. त्याचा रुग्णांसाठी फायदा होणार आहे, असे करमाळा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता निमगिरे यांनी म्हटले आहे.

माजी सभापती निमगिरे म्हणाल्या, ‘कोणतीही शस्रक्रिया करायची असेल तर त्यात तज्ञ डॉक्टरांबरोबर भूलतज्ञही आवश्यक असतात. मात्र करमाळ्यात शासकीय उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ञ नव्हते. करमाळ्यात नियुक्ती झाल्यानंतर येथे पदभार स्वीकारायला नकार दिला जात होता, असे सांगितले जात. परंतु आमदार शिंदे यांचा यामध्ये कायमच पाठपुरावा महत्वाचा ठरला आहे.’

पुढे बोलताना माजी सभापती निमगिरे म्हणल्या, ‘तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा सक्षम करण्यावर आमदार शिंदे यांनी कायम भर दिला आहे. शिंदे हे आमदार झाले आणि त्यांनी आरोग्य सेवा सुरळीत करण्यावर भर दिला. त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना उपचार मिळावेत म्हणून योग्य ती खबरदारी घेतली. अनेकदा गोरगरीब रुग्णांना सिजरींग प्रसूती करावी लागते. त्यात हजारो रुपये खर्च होतात. हा खर्च कमी व्हावा आणि रुग्णसेवा मिळावी म्हणून आमदार शिंदे यांनी प्रयत्न केले.’

२०१४ पासून करमाळा उपजिल्हा रुग्णालयात ६०८ सिजर झाले आहेत. त्यातील २०१९ पर्यंत फक्त १२ सिजर झालेल्या आहेत. २०१४ मध्ये ७ व २०१५ मध्ये ५ सिजर आहेत. २०१९ ते आतापर्यंत ५९७ सिजर झाल्या आहेत. यावरून आमदार शिंदे यांनी आरोग्य सेवा सक्षम करण्यावर भर दिला असल्याचे दिसते. २०१६ ते २०१९ दरम्यान एकही सिजर झाले नसल्याची नोंद उपजिल्हा रुग्णालयात आहे. तर २०२०-२१ मध्ये १४५, २०२१- २२ मध्ये ८६, २०२२-२३ मध्ये १८०, २०२३- २४ मध्ये १५३ व २०२४ मध्ये (आतापर्यंत) ३२ सिजर झाल्याची नोंद आहे, असे ते म्हणाल्या आहेत.

करमाळा हा सोलापूर जिल्ह्याचा शेवटचा आणि सर्वात लांब तालुका आहे. येथील आरोग्य व्यवस्था सक्षम होणे आवश्यक आहे. येथील इमारतीचे काम सध्या सुरु आहे. कर्मचारी वसाहत येथे होत आहे. आमदार शिंदे यांनी यासाठी केलेले प्रयत्न महत्वाचे आहे. येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आमदार शिंदे यांचे विशेष लक्ष आहे. रुग्णांना सेवा देण्यावर त्यांचा भर आहे, भविष्यात आणखी आरोग्यसेवा सक्षम करण्याचा मानस आमदार शिंदे यांचा आहे, असे माजी सभापती निमगिरे म्हणल्या आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *