करमाळा (अशोक मुरूमकर) : आळजापूर येथे नव्याने सुरु झालेल्या पोस्ट कार्यालयाचे उदघाटन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. अनेक दिवसांपासून येथील ग्रामस्थांच्या मागणीला हे यश आले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना टपाल, आर्थिक व शासकीय सेवा सहज, सुलभ व वेळेत उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हे पोस्ट कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ थेट गावातच नागरिकांना मिळणार आहे. डीबीटी (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे लाभार्थ्यांना अनुदान, निवृत्तीवेतन व इतर रक्कम थेट खात्यावर मिळण्यास यामुळे मदत होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) संतोष वारे, अमरजित साळुंखे, आदिनाथ कारखान्याचे संचालक डॉ. अमोल घाडगे, सचिन नलवडे यांच्यासह आळजापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच, सदस्य, माजी सरपंच, माजी सदस्य यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालय येथे पोस्ट कार्यालय सुरु करण्यात आले आहे. सरपंच संजय रोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
