करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपकडे इच्छुक असेलेल्या उमेदवारांच्या उद्या (रविवार) मुलाखती घेतल्या जाणार आहेत. विद्यानगर (बागल निवासस्थान) येथील भाजप कार्यालयात या मुलाखती होणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिली आहे. चिवटे म्हणाले, ‘करमाळा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकिसाठी भाजपच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या इच्छुकांच्या मुलाखती जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदारव महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांच्या उपस्थितीत होणार आहेत. रविवारी (ता. 18) सकाळी 11 वाजता कार्यालयात इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन, चिवटे यांनी केले आहे.
झेडपी- पंचायत समितीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या उद्या मुलाखती
