करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका गटातटाच्या राजकारणाला कंटाळला असून सामान्य नागरिक व शेतकऱ्यांना न्याय देऊन विकास करण्यासाठी प्रा. रामदास झोळ यांना पाठिंबा देत असल्याचे हिंगणीचे माजी सरपंच हनुमंत पाटील यांनी जाहीर केले.
हिंगणीमध्ये प्रा.झोळ यांचा ‘जन संवाद मेळावा’ झाला. प्रा. झोळ म्हणाले, करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम आपण केले आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळून देऊन त्यांच्या थकीत बिलासाठी आंदोलन करून न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. विकासाच्या प्रश्नावर आपण येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असून वीज, रस्ते पाणी व आरोग्य याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी एमआयडिसीच्या माध्यमातून विविध उद्योग आणून शिक्षणाची सोय करण्यासाठी मोठे शिक्षण संकुल उभा करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
हिंगणीचे माजी सरपंच पाटील यांचा व सर्व समर्थकांना घेऊन त्यांनी प्रा. झोळ यांना विधानसभेसाठी पाठिंबा दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी गोडगे, गणेश बाबर, अंगद बाबर, प्रवीण बाबर, सोसायटीचे माजी संचालक तानाजी बाबर, दत्तात्रेय तावरे, रज्जाक शेख, नामदेव बाबर, माजी सदस्य ग्रामपंचायत रज्जाक शेख, हरी रोकडे, रोहिदास डोकडे, परशुराम शिंदे, किसन बाबर, शाम जाधव, जयकुमार गलांडे, हिरालाल गायकवाड, शब्बीर शेख आदी यावेळी उपस्थित होते.
हलगीच्या तालात जल्लोष करत दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ व प्रा. झोळ यांचे येथे ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना मिळणारा पाठींबा हा चर्चेचा विषय ठरला आहे.