करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. या निवडणुकीत त्यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी यांची ही पहिलीच निवडणूक होती. त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी काम पाहिले.
नगरपालिकेची आचारसंहित जाहीर झाल्यापासून ही निवडणूक यशस्वीरीत्या पार पडवी यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न असतात. आणि त्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती केली जाते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी वेगवेगळ्या जबाबदारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर देतात.
निवडणुकीत उमेदवारांसाठी विविधप्रकारचे नगरपालिकेचे ना हरकत दाखले, ईव्हीएम मशीन व स्ट्रॉगरूम व्यवस्थापन, मतदान साहित्य वाटप, प्रचार परवानग्या, दैंनदिन व्यहवार, वाहतूक आराखडा, सेक्टर नकाशाविषयक कामकाज, हिकणी कक्ष, महिलांसाठी मतदान केंद्र, कंट्रोलरूम आदीच्या जबाबदाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दिल्या जातात. यावर्षी झालेल्या निवडणुकीत अनेकजण नवखे होते. मात्र त्यांनी निवडणूक यशस्वी पार पडली असल्याचे दिसत आहे.
स्वप्नील बाळेकर, पियुष शिंपी, हिंदुराव जगताप, प्रशांत खारगे, शशांक भोसले, मल्हारी चांदगुडे, विपुल पुजारी, ईश्वर खराडे, शीतल बहाड, कमलाकर भोज, तुषार टंकसाळे, संकल्प शहाणे, सचिन घाटुळे, आकाश वाघमारे, बाळनाथ क्षीरसागर, अमोगसिद्ध परशेट्टी, सोमनाथ सरवदे, प्रदीप चौकटे, अश्विनी जाधव, सुप्रिया पालखे, व्ही. व्ही. बडेकर, गजानन राक्षे, दत्तात्रय घोलप आदींनी ही निवडणूक यशस्वी व्हावी यासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यात बदल झाले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर स्थिर सर्वेक्षण पथकाचे दुर्लक्ष आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना शेवटच्या दिवशी कक्षात अपुऱ्या जागेमुळे झालेला गोंधळ यात तत्काळ सुधारणा करत आवश्यक तेथे बदल आणि नागरिकांना सुविधा देत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
