करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे हे इच्छुक आहेत. तिकीट मिळावे यासाठी त्यांचे मुंबई दरबारी प्रयत्न सुरु आहेत. वरिष्ठांच्या आदेशाने त्यांनी उमेदवारी अर्ज देखील घेतला आहे. यावर त्यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी संवाद साधला आहे.
चिवटे म्हणाले, ‘करमाळा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. हा मतदारसंघ भाजपला मिळावा हा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. येथे पक्ष वाढण्यासाठी आम्ही काम केले आहे. आता पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे. करमाळा विधानसभा मतदासंघात आम्ही केलेल्या मागणीनुसार वरिष्ठानी अर्ज घेण्यास सांगितला. अर्ज घेऊन दाखल केला जाणार आहे. पक्ष आदेश मानून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि जागेचा दावा आम्ही सोडलेला नाही. दोन दिवसात काय होते हे पाहू. मात्र पक्षाचा आदेश आमच्यासाठी अंतिम राहील’, असे चिवटे म्हणाले आहेत.