करमाळा (अशोक मुरुमकर) : करमाळा तालुक्यातील उंदरगाव ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. यामध्ये सरपंच म्हणून युवराज मगर हे तर सदस्य म्हणून पुनम कोकरे, समाधान कांबळे, रामहरी गरधडे, धनंजय कांबळे, हर्षदा कांबळे, शिवाजी कोकरे, सुप्रीया मगर हे सदस्य म्हणून बिनविरोध निवडले आहेत. अतिशय शेवटच्याक्षणी ही निवडणुक बिनविरोध झाली आहे. येथे सर्व गटांनी एकत्र येऊन निर्णय घेतला. त्यानंतर शेवटच्याक्षणी ही निवडणुक बिनविरोध झाली.
