करमाळा (अशोक मुरूमकर) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता. ५) समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. यामध्ये निवडणुकीच्या रणनीतीवर विचारविनिमय होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येत असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. करमाळा तालुक्यात जगताप गटाची भूमिका महत्वाची राहणार आहे. आगामी निवडणुकीत रणनीती ठरवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात माजी आमदार जगताप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ५ जानेवारीला दुपारी १ वाजता निलज रोड येथील यशोदीप मंगल कार्यालय येथे हा मेळावा होणार आहे.
जगताप गटाचा उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा
