The president of Makai Dinesh Bhandvlkar gave Pro Ramdas Zol allegation Reaction toThe president of Makai Dinesh Bhandvlkar gave Pro Ramdas Zol allegation Reaction to

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी साखर कारखान्याबाबत प्रा. रामदास झोळ यांनी केलेल्या आरोपांवर बागल गटाने प्रतिक्रिया दिली आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर यांनी आरोप फेटाळले असून कारखान्याचे कर्ज प्रकरण मार्गी लागत असताना जाणीवपूर्वक बँकेची आणि सभासदांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

मकाई कारखान्याचे अध्यक्ष भांडवलकर यांनी म्हटले आहे की, ‘आरआरसीची कारवाई महाराष्ट्रातील एफआरपी न दिलेल्या प्रत्येक कारखान्यावर होत आहे. तर मकाई कारखान्याची साखरही केंद्र सरकार व राज्याच्या नियमानुसार विक्री करून मागील आणि चालू वर्षाची देणी दिली. सदरची देणे देताना स्वतः कारखान्याने कोणतेही कर्ज कोणत्याही बँकेकडून न घेता ही सर्व देणी आदा केली. याच खरंतर कौतुक करणे गरजेचे असताना देखील शेतकरी सभासदाला अडचणीत आणणे आणि मुद्दामुन कारखान्याची बदनामी करणे या करता बेछुट आरोप करून आता कर्जप्रकरण मार्गी लागत असताना जाणीवपूर्वक बँकांची आणि सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळी मात्र आम्ही अशा बेछुट आरोपांना आता अब्रू नुकसानीचा दावा दाखल करूनच उत्तर देऊ,’ असे भांडवलकर यांनी स्पष्ट केले आहे.’ प्रा. झोळ यांचा नामोल्लेख टाळत अध्यक्ष भांडवलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आरोप फेटाळले आहेत.
बागल गटाला दणका, मकाईत साखर घोटाळा! शेतकर्यांच्या थकबाकीप्रकरणी संचालक मंडळाच्या मालमत्तेवर बोजा चढवण्याची प्रक्रीया सुरु

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *