करमाळा (सोलापूर) : करमाळा शहर व तालुक्यातील कैकाडी समाजासाठी उभारण्यात येणाऱ्या संत कैकाडी महाराज सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजित माने व भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे यांच्या हस्ते करमाळा येथील केशव विहीर परिसरात करण्यात आले.
या भव्य अशा सांस्कृतिक भावनामुळे कैकाडी समाजासह गोरगरीब घटकांना सामुदायिक कार्यक्रमासाठी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे. या भवनाची मागणी कैकाडी समाजाचे लोकप्रिय नेते व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव यांनी केली होती. या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक रणजित माने म्हणाले की, भाजपचे नेते गणेशभाऊ चिवटे यांनी गोरगरीब समाजासाठी हे सांस्कृतिक भवन मंजूर करून दिले आहे. त्यामुळे सामाजिक कार्यासाठी या सांस्कृतिक भवनाची मोठी सोय होणार असून करमाळा शहराच्या वैभवात या सांस्कृतिक भवनामुळे भर पडणार आहे.
यावेळी गणेश चिवटे म्हणाले की, करमाळा शहरात आजवर कोणतेही सामुदायिक समाजमंदिर नव्हते, अफसरतात्या जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे आज हे समाजमंदिर उभे राहत आहे. यामुळे गोरगरीब लोकांचे छोटे-मोठे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम कमी खर्चात पार पाडता येणार आहेत. या सांस्कृतिक भवनाच्या उभारणीसाठी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे असे चिवटे यांनी सांगितले,
मी गेली अनेक वर्ष माझे मित्र गणेशभाऊ चिवटे यांच्याकडे पाठपुरावा करत होतो त्यांनी त्यांच्या सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमच्या समाजासाठी तब्बल ४० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे, त्यामुळे समाजासाठी व शहरातील गोरगरीब जनतेसाठी एक भव्य असे सांस्कृतिक भवन उभा राहत आहे, आम्ही समाज्याच्या वतीने त्यांचे आभार मानतो, अफसर जाधव – डबल महाराष्ट्र चॅम्पियन
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन झिंजाडे यांनी हे भव्य दिव्य सांस्कृतिक भवन येणाऱ्या काळात समाजासाठी मोठं योगदान ठरणार असून गणेशभाऊ चिवटे व अफसर तात्या जाधव यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठ यश आले आहे असे प्रतिपादन केले, सूत्रसंचालन ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी यांनी केले.
यावेळी भाजपा नेते रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल , रामकृष्ण माने, संतोष जाधव, मारुती जाधव, रवी जाधव, धनंजय माने, सचिन माने, आकाश जाधव, बाळासाहेब कुंभार, अमोल पवार, सरपंच सुभाष हानपुडे, संजय दुरगुळे, सोमनाथ घाडगे, बंडू शिंदे, विष्णू रंदवे, पत्रकार दिनेश मडके, राजु सय्यद, राजश्री खाडे, संगीता नष्टे, चंपावती कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते,